Mahadev Betting App Scam महादेव अ‍ॅपने कसा बनवला विश्वास खांब? — चरण-दर-चरण खुलासा.

Mahadev Betting App Scam महादेव अ‍ॅपने कसा बनवला विश्वास खांब? — चरण-दर-चरण खुलासा.

Mahadev Betting App Scam महादेव अ‍ॅपने कसा बनवला विश्वास खांब? — चरण-दर-चरण खुलासा आजवर आपण ह्या ॲप ने फसवणूक, केली त्या ॲप ने फसवणूक केली असे भरपूर किस्से ऐकले असतील. पण आज आपण जाणून घेऊया, एका साधारण ज्यूस चे दुकान चालवणाऱ्या मुलाने कशा प्रकारे पाच हजार कोटींचा घोटाळा केला हे आज आपण जाणून घेऊयात.

यामागील लेखात आपण सट्टा मटक्याचा इतिहास, परिणाम, तरुणाईवर होणारा परिणाम या सर्वांवर अभ्यास केला. पण आपल्या या लेखात आपण एका  ऑनलाइन ॲप किंवा प्लॅटफॉर्म बद्दल जाणून घेऊया की जनतेची कशी फसवणूक ह्या ॲप ने केली. लोकांना सट्ट्याचे व्यसन लावून किती लवकर त्यांना ह्या जाळ्यात अडकवले जाते हे या लेखात आपण  पाहू.

या लेखात आम्ही ‘महादेव’ ऑनलाईन बेटिंग ॲप याबद्दल बोलत आहोत. Mahadev Betting App Scam ह्या ॲप चा शोध कोणी लावला, संरचना कोणी केली, तसेच या ॲप द्वारे कशाप्रकारे लोकांना लुटून त्यांची फसवणूक करण्यात आली ही सर्व माहिती सविस्तरपणे वाचा. 

महादेव हे देवाचे नाव ऐकताच आपण सर्व मनातून प्रसन्न होतो.Mahadev Betting App Scam पण ह्याच नावाचे ॲप खोलून 5000 कोटींचा घोटाळा करणारी ही आहेत.

महादेव बेटिंग ॲप ची सुरुवात कोणी केली ? :-Mahadev Betting App Scam

महादेव बेटिंग ॲप ही अलीकडील काळातील सर्वात जास्त ऑनलाइन खेळल्या जाणाऱ्या ॲप मधून एक होते. जीने सर्व साधारण पणे 5000 कोटींची उलाढाल सरकार पासून लपून-छपून गुप्त पद्धतीने केली आहे. या ॲपच्या रॅकेट मध्ये अनेक दिग्गज लोक समाविष्ट आहेत असे म्हटले जाते. या ॲप ची संकल्पना छत्तीसगड येथील भिलाई येथे राहणाऱ्या सौरभ चंद्राकर याच्या डोक्यात आली.

 सौरभ चंद्राकर यांचा जन्म साधारण पने अंदाजे 13 जानेवारी 1995 ला झाला. Mahadev Betting App Scam त्याचा जन्म छत्तीसगढ येथील भिलाई येथे झाला. तो एका सर्वसामान्य कुटुंबातील रहिवासी होता. त्याचे वडील भिलाई येथील नगर निगम येथे कामाला होते. त्याचे शिक्षण भिलाई मधील K H MEMORIAL SCHOOL येथे झाले. सौरभ ची सुरुवाती पासूनच नोकरी करण्याची थोडीशी आवड व इच्छा नव्हती.

 त्याला सुरुवाती पासूनच व्यवसाय करायचा होता आणि खूप पैसा कमवायचा होता. यासाठी तो प्रत्येकाचा सल्ला घेत की, मी कोणता  व्यवसाय करू ? मग त्याला एका मित्राने सांगितले की ज्यूस च्या दुकानात खूप कमाई आहे व भरपूर चालते त्यासाठी ज्यूस चे दुकान टाक. 2018 साली त्याने मित्राच्या सल्ल्यानुसार घरच्यांकडून ज्यूस चा व्यवसाय चालू Mahadev Betting App Scam करण्यासाठी पैसे जमविले. 2018 साली त्याने आपला पहिला व्यवसाय सुरू केला.

सौरभने छत्तीसगढची राजधानी रायपूर येथील भिलाई मध्येच नेहरूनगर ला ज्यूस फॅक्टरी चौपाटी नावाने दुकान उघडली. त्याच्या व्यवसाय चांगला गल्ला करू लागला. आता सौरभ चंद्राकर चांगली कमाई करू लागला. पैसे कमवायला लागल्यावर त्याचे नवीन मित्र तयार व्हायला लागले. तसेच त्याचा मित्रपरिवार ही भरपूर वाढला. नवीन मित्र अनेकदा नवीन सांगत लावतात.

व असे म्हटले जाते ज्या लोकांमध्ये तुम्ही उठता बसता त्यांची संगत तुम्हाला लागते. हे सौरभ याच्या बरोबर घडले. त्याला सर्व जुगार खेळणारे व दारूचे व्यसन करणारे तसेच दिवसभर सट्टा लावणारे मित्र त्याला भेटत गेली. असाच एक मित्र त्याला भेटला. ज्याचे नाव रवी उप्पल असे होते. भिलाई मध्ये त्याचेही दुकान होते. तो एक  टायरचे दुकान चालवत होता.

त्याचेही दुकान चांगले चालत होते. रवी उप्पल व सौरभ चंद्राकर हे दोघेही महादेव बेटिंग चे फाउंडर व मालक आहेत. दोघेही सोबत सट्टा खेळायचे. परंतु काही दिवसातच किंवा महिन्यात त्यांचे भरपूर पैसे या जुगाराच्या खेळात गेले. सौरभ ला तीन पत्ती यासारख्या पत्त्याच्या खेळाची जास्त आवड होती. तो सर्व प्रकारचे जुगार खेळत असत व रवि हा त्याला जोडीदार होता. दोघांचेही भरपूर प्रमाणात पैसे या जुगारात गेले. Mahadev Betting App Scam

Mahadev Betting App Scam ची सुरुवात कशी झाली? :- 

एक दिवस असेच सौरभ जुगार खेळत असता वेळेस त्याचे भरपूर पैसे पत्त्यात गेले. नंतर तो बसला असताना त्याला असेच मोबाईलवर ऑनलाइन रमी किंवा तीन पत्ती म्हणतात अशा कोणत्यातरी सट्ट्याचे मेसेज आले. हे वाचून त्याला एक आयडिया आली. आणि इथूनच “महादेव बुक” ॲप ची संकल्पना त्याच्या डोक्यात आली. त्यांनी 2019 मध्ये ‘ महादेव’ ही सट्टा लावायची ॲप चालू केली. त्याने ॲप बनवताना त्यात असे बदल केले की, कधीही सौरभ ह्यालाच पैसे येतील.

ॲप बनवल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी 48 हजार रुपये जिंकले. याबरोबरच त्याची उत्सुकता आणखी वाढली. या ॲप मध्ये सौरभ यानी अशी सेटिंग करून ठेवली की, जो खेळाडू असेल त्याला पहिले दोन/तीन डाव खेळणाऱ्याला पैसे यायचे ह्यामुळे खेळणाऱ्याची ह्या गेम बद्दल उत्सुकता खूप वाढायची, नंतर अजून पैसे लावून गेम जिंकण्याची तो अशा लावून बसत.Mahadev Betting App Scam

पण खेळणाऱ्याला माहित होत नव्हते की गेम आधीच ठरलेला आहे किंवा फिक्स आहे. यामध्ये विनर हा पहिलेच फिक्स असायचा. जोपर्यंत समोरच्याचे पूर्ण पैसे या ॲपच्या मालकाला लुबाडता येत नाही तोपर्यंत ते शांत बसत नव्हते. खेळाडूचे पूर्ण बँक अकाउंट खाली करू पर्यंत सौरभ ला चैन पडत नव्हता. हळूहळू सौरभ ची भूक हळूहळू वाढू लागली. त्याने सुरुवातीला पूर्ण छत्तीसगढ मध्ये याचे नेटवर्क पसरवून यात भरपूर लोकांना सामील केले. असे म्हटले जाते की, चालू केल्यानंतर एका महिन्यातच या ॲप ने 50 लाख नवीन खेळाडू या खेळात जोडले गेले.

पण हे ॲप विनापरवाना व अवैध असल्यामुळे मालकांना म्हणजेच सौरभ चंद्राकर व रवी उप्पल यांना नेहमीच भीती होती. त्यानंतर 2019 ला जेव्हा ॲप जास्त प्रमाणात आर्थिक व्यवहार वाढल्या नंतर सौरभ चंद्राकर आणि त्याचा जोडीदार रवी उप्पल हे दुबईला पळून गेले. व दुबई मधून आपले सर्व व्यवहार फिरवायला चालू केले. Mahadev Betting App Scam अशा बेनामी ॲप च्या मालकांना व चालकाला सरकारची नेहमीच भीती असते. त्यामुळे सरकारच्या व प्रशासनाच्या या भीतीमुळे ते कधीही उघडपणे असे ॲप चालवत नाहीत, तसेच व्यवहारही उघडपणे करत नाही.

तसेच यावर होणारे सर्व व्यवहार हे बेकायदेशीर पणे करत असतात. या अशाच भीतीमुळे व बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी सौरभ व रवी उप्पल यांनी 13000 ID DISTRIBUTOR ठेवले. यांच्याद्वारे ते ॲप वर व्यवहार करत. आयडी वाल्या एजंटला 30 टक्के व मालकाला 70 टक्के असे 30/70 चे गणित सौरभ व रवी यांनी आखले. ते ॲप मध्ये एजंट च्या वतीने पैसे घेत होते.

कारण यामध्ये ॲप मध्ये तात्काळ पैसे घेतल्यास त्यांचे कायद्यात अडकण्याचे व गुंतण्याचे जास्त चान्स होते. यावर एक उपाय म्हणून ते खेळणाऱ्याच्या व्हाट्सअप ला एक बँक अकाउंट किंवा खात्याची माहिती टाकून त्यावर पैसे टाकण्यास सांगायचे. पैसे त्या खात्यावर जमा झाल्यावर ते खेळणाऱ्या व्यक्तीच्या ॲप मध्ये काही पॉईंट टाकायचे आणि त्याद्वारे त्याला खेळायला सांगायचे. तसेच पैसे काढण्यासाठीही त्यांनी अशीच पद्धत राबवली. Mahadev Betting App Scam ज्याला ॲप मधील जिंकलेले पैसे काढायचे आहेत, त्याला व्हाट्सअप ला बँक खात्याची माहिती विचारून, ती माहिती आपल्याकडे ठेवून त्याला ऑनलाईन पैसे त्याच्या खात्यावर ही लोक पैसे जमा करायची. असे करता करता त्यांनी बरेच वर्ष सरकारच्या व कायद्याच्या आसपास ह्या खात्यांवरून व्यवहार केले. 

या लागणाऱ्या देवाण घेवाणी साठी त्यांना भरपूर सारे बँक अकाउंट पाहिजे होते. यासाठी त्यांनी सामान्य नागरिकांना हाताखाली धरले. व सर्वसामान्य जनतेच्या खात्यातून व्यवहार केल्यामुळे त्यांना पकडणे भरपूर प्रमाणात अवघड होते. हे खाते वापरण्यासाठी ते काही गरीब व्यक्ती हाताखाली धरत. त्यांना दोन ते तीन हजार रुपये देऊन त्यांचे बँक खाते उघडून घेत.

नंतर त्यांची सर्व माहिती आपल्याकडे ठेवून या खात्यातून पैशांची देवाण-घेवाण सौरभ करत असत. खाते वापरण्यासाठी तो त्यांना महिन्याला पैसे देत होता. असे करून त्याने हजारो कोटींचा घोटाळा कोणाच्याही नजरेत न येता दुबईतून केला. सुरुवातीला हे ॲप फक्त छत्तीसगढ मध्येच जास्त प्रमाणात चालत होते. नंतर याचे जाळे पूर्ण भारतभर पसरत गेले.Mahadev Betting App Scam

Mahadev Betting App Scam महादेव अ‍ॅपने कसा बनवला विश्वास खांब? — चरण-दर-चरण खुलासा.

पैशांची देवाण-घेवाण करण्या साठी सुमारे बँक अकाउंट उघडले गेले. त्याने लोकांना जुगाराची गरज व लत लावून स्वतः खूप सारे पैसे छापले. भारता बरोबरच सौरभ याने श्रीलंका, नेपाळ तसेच पाकिस्तान अशा अनेक देशात आपल्या एजंटचे Mahadev Betting App Scam भव्य जाळे तयार केले.

 प्रत्येक शहरात एक सेटअप स्थापन करून तेथूनच पूर्ण शहरातील सट्टा स्वतः कंट्रोल करीत असत. सौरभने यामध्ये साखळी पद्धत तयार करून पूर्णपणे लोकांना यात जोडले. छत्तीसगढ मधील कित्येक तरुण आपल्या बेकायदेशीर ॲपच्या नफा वाढीसाठी दुबईत काम शिकायला सौरभ घेऊन गेला. आणि अशा अनेक तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून आपले काम चालू होण्यासाठी त्यांना दुबईत घेऊन गेला. तसेच इतर देशातही आपले एजंट वाढवून ॲपची चांगलीच जाहिरात केली.Mahadev Betting App Scam

त्याने आपल्या ॲप मध्ये आणखी खेळाडू जोडण्यासाठी अनेक मोठ्या नटांना व प्रतिष्ठित व्यक्तींना आपल्या ॲपची जाहिरात करण्यासाठी भरपूर पैसे दिले. या प्रकरणी इडी ने सुद्धा  त्यांची कसून चौकशी केलेली आहे. Mahadev Betting App Scam लॉकडाऊन च्या काळात तर महादेव अप दररोजचा दोनशे कोटींच्या आसपास सट्टा लावला जात होता. यात प्रामुख्याने भारतातील खेळली जाणारी क्रिकेटची सुप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग याच्यावर सट्टा लावला जात होता.

तसेच क्रिकेट पासून तर निवडणुकी पर्यंत सर्व गोष्टींवर या ॲप वर सट्टा लावला जात होता. एका वर्षाच्या आतच ह्या ॲप ने खूप लोकप्रियता मिळवली. तसेच अनेक जणांना आर्थिक अडचणीत आणण्याचे काम यांनी केले. देशात मनी लाँड्रिंग, हवाला याद्वारे विदेशात पैसे पाठवायचे काम सौरभ याने केले.Mahadev Betting App Scam

तसेच बंद पडलेल्या कंपन्यांच्या द्वारे त्यांचे अकाउंट वापरायला घेऊन पैशाची देवाण घेवाण सौरभ त्यांच्या अकाउंट वरून करत होता. हवाला द्वारे पैसे फिरवल्याचाही सौरभ याच्या वर आरोप आहे. तसेच त्यांनी हॉटेल चित्रपट यामध्ये कोटींची गुंतवणूक केली. सौरभच्या या घोटाळ्यात पोलिस प्रशासनातील बरेच जण मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत असेही इडी च्या लक्षात आले होते. तसेच देशातील बडे राजकारणीही यात सहभागी होते. ज्यांनी पैसे घेऊन बरेच दिवस सरकार पासून व कायद्या पासून ह्या ॲप ला संरक्षण द्यायचे काम केले.

कसा पकडले गेला सौरभ ? :-

फेब्रुवारी 2020 मध्ये आयकर विभागांनी छत्तीसगढ मधील अनेक सरकारी नोकरदार, राजकारणी व तसेच अन्य व्यक्तीवर छापे टाकले असता महादेव बेटिंग ॲप चे नाव पुढे येऊ लागले. मग त्यानंतर पोलीस प्रशासनाने धडाधड छापे मारून व कारवाई करून अनेक एजंटला तुरुंगा आड केले.

 तसेच जनतेत या  सट्ट्या बद्दल बदल जागरूकता निर्माण करण्याचे काम चालू केले. यानंतर सौरभ व रवी यांचे भरपूर एजंट दुबईला पसार झाले. फेब्रुवारी 2023 मध्ये सौरभ चा विवाह पार पडला. या विवाह सोहळ्यात जवळपास 200 कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला असे आयकर विभागाचे म्हणणे होते. नातेवाईकांना घेऊन जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केली गेली.

त्याच्या लग्नामध्ये अनेक बॉलीवूडचे अभिनेते तसेच बडे हस्ती ही उपस्थित होत्या. ऑगस्ट 2023 मध्ये पोलिसांनी या ॲप सोबत संबंधित अनेक लोकांना पकडले. त्यानंतर ईडी ne 15 सप्टेंबर ला कोलकत्ता, भोपाळ तसेच मुंबई सोबतच 39 मोठ्या शहरात छापेमारी करत जवळपास 417 कोटी च्या आसपास पैसे जप्त केले. हे सर्व पैसे हवाला द्वारे  दुबई पोहोचविण्याचा आरोपही सौरभ यावर केलेला आहे.

 त्याचबरोबर पोलिसांना इतर अनेक Mahadev Betting App Scam या ॲपच्या जोडीने काम करत असल्याचे पुरावे सापडले होते. याचबरोबर इडी ने असेही म्हटले आहे की अनेक मवाळवादी व तसेच मुंबई मधील अनेक अंडरवर्ल्ड च्या माणसां सोबत सौरभ याचे नाव जोडले गेले. ईडीने अनेक लोकांना या बाबतीत चौकशीत घेतले होते.

 तसेच कोलकत्ता मधील एक माणूस ज्याने रवी व सौरभ यांचे सर्व पैसे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचा, व तसेच हवाल्याचे सर्व व्यवहार तोच व्यक्ती सांभाळत होता त्यालाही इडी ने ताब्यात घेतले. यासाठी आपण सर्वांनी कोणताही सट्टा तसेच ऑनलाईन पैसा वर चालणारे खेळ खेळण्या आधी पूर्णपणे विचार केला पाहिजे. आणि अशा सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म पासून सुरक्षित राहून आपला आर्थिक बचाव केला पाहिजे. 

Leave a Comment